Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:24
9 Iomraidhean Croise  

एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.


‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


शौल व सर्व इस्राएल ह्यांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले.


तो त्यांच्याबरोबर बोलत असता, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले.


इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan