Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि हे खव्याचे दहा गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे; तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खूण आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 हे लोण्याचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:18
13 Iomraidhean Croise  

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.”


तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्‍यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला.


मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.


एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्‍या घालत असे.


तू मला दुधासारखे ओतून दह्यासारखे विरजवले नाहीस काय?


तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले.


मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.”


ते तिकडे वळले आणि मीखाच्या घरी राहणार्‍या तरुण लेवीच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले.


मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले.


शौल, तुझे भाऊ व सर्व इस्राएल लोक एला नामक खोर्‍यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत.”


तेव्हा दाविदाने दहा तरुण पुरुषांना तेथे पाठवले; त्याने त्या तरुणांना सांगितले की, “कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा.


मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan