Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहूदा देशातील सोखो ह्या ठिकाणी जमून सोखो व अजेका ह्यांच्या दरम्यान अफस-दम्मीम येथे छावणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहूदीयातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफस-दम्मीमात आपली छावणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 17:1
11 Iomraidhean Croise  

तो पस-दम्मीम2 येथे दाविदाबरोबर होता; तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.


बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,


आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.


त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.


यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;


पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.


तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.


शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत गेला, आणि पलिष्टीही आपापल्या ठिकाणी गेले.


शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.


इस्राएल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिष्ट्यांनी ऐकले तेव्हा त्यांचे सरदार इस्राएल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्राएल लोकांना पलिष्ट्यांची भीती वाटली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan