Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला; शौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 16:21
13 Iomraidhean Croise  

मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला.


आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत.


अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.


अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशवा ह्याचा प्रवेश होईल. तू त्याला धीर दे; कारण तो देश इस्राएलास वतन म्हणून तो मिळवून देईल.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.


तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलावून म्हटले, “आपली तलवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जिवे मारले असे लोक म्हणतील.” त्या तरुणाने त्याला भोसकले तेव्हा तो मरण पावला.


शौलाने इशायाला सांगून पाठवले की, ‘दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे. कारण माझी त्याच्यावर मर्जी बसली आहे.”


दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जातयेत असे.


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


योनाथानाने दाविदाला बोलावून आणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या; मग योनाथानाने दाविदाला शौलाकडे नेले; आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan