Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 16:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यापैकी एका सेवकाने उत्तर दिले, “मी बेथलेहेमकर इशायाचा पुत्र पाहिला आहे, तो वीणा वादनात निपुण आहे. तो शूर व योद्धा आहे, तो उत्तम वक्ता व रूपवान आहे; व याहवेह त्याच्याबरोबर आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 16:18
16 Iomraidhean Croise  

परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे.


त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.


ह्या गोष्टीचे स्वरूप बदलावे म्हणून आपला सेवक यवाब ह्याने हे केले आहे; धनीमहाराज देवदूतासारखे चतुर आहेत, आणि पृथ्वीवर जे काही होते ते सर्व त्यांना कळते.”


म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.


हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही.


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस; कारण देव तुझ्याबरोबर आहे.


त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे.”


ह्यावरून शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक उत्तम वाद्य वाजवणारा पाहून त्याला माझ्याकडे घेऊन या.”


हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, “तुझा पुत्र दावीद शेरडेमेंढरे राखत आहे त्याला माझ्याकडे पाठवून दे.”


आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता.


शमुवेल वाढत गेला; परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan