Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?” इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.” शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 16:11
8 Iomraidhean Croise  

अम्नोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र; तो मोठा चतुर होता.


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून, मेंढरांमागे चालत असताना आणले,


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही.


दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan