१ शमुवेल 15:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तथापि शौलाने व लोकांनी अगागला जिवंत ठेवले; तसेच मेंढरे, बैल, पशु, कोकरे, असे जे काही चांगले धष्टपुष्ट ते राखून ठेवले त्यांचा अगदीच नाश केला नाही; परंतु जे टाकाऊ आणि निरूपयोगी होते त्या सर्वांचा त्यांनी संपूर्ण नाश केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला. Faic an caibideil |