Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले, आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:8
15 Iomraidhean Croise  

अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळवलेली ही लूट होती.


उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले; तेव्हा शहराचा तट कोसळून त्यांच्यातल्या सत्तावीस हजार लोकांवर पडला. बेन-हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला.


तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत.


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


मानवप्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल, तर त्याला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.


त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.


त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.


परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.


आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.


शौल शमुवेलाला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे.


तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’


नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.


दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्‍या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan