Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्यांचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर त्यांना सोडू नको तर पुरुष व स्त्रिया मुले व बालके व गाय-बैल, मेंढरे व उंट व गाढव यांना जिवे मार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तर आता तू जा, अमालेक्यांवर हल्ला कर आणि त्यांचे जे काही आहे त्या सर्वांचा सर्वस्वी नाश कर. त्यांची गय करू नको; त्यांचे पुरुष व स्त्रिया, लेकरे व तान्ही बाळे, गुरे व मेंढरे, उंट व गाढवे हे सर्व मारून टाक.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:3
20 Iomraidhean Croise  

एसावाचा मुलगा अलीपाज ह्याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश.


तो मला म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ मी त्याला म्हणालो, ‘मी अमालेकी आहे.’


आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;


मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”


तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.


त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.


त्याने पराक्रम केला आणि अमालेकी लोकांना जिंकून इस्राएलांस जे जे लुटत असत त्यांच्या हातातून त्यांना सोडवले.


मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’


तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.


नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.


दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्रीपुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे, उंट आणि वस्त्रप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला.


तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan