Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मग शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; कारण मी परमेश्वराची आज्ञा व तुझी वचने मोडली आहेत, ते यामुळे की, लोकांचे भय धरून मी त्यांचे ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:24
21 Iomraidhean Croise  

आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.”


आदामाला तो म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस; म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील;


दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस.


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस,


तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “मी ह्या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत.


मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.


तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.”


बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे; तू माझ्याविरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते; तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो.”


“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे.”


मग तो म्हणाला, “मी तर पाप केलेच आहे, तरीपण आता माझ्या प्रजेच्या वडील जनांसमोर व इस्राएलासमोर माझा मान राखा व माझ्याबरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याची मी उपासना करीन.”


तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


तेव्हा शौल म्हणाला, “मी अपराधी आहे; माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये; आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काहीएक उपद्रव करणार नाही; मी मूर्खपणाने वागलो आहे, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan