Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:22
24 Iomraidhean Croise  

हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला;


म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे;


नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.


तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक; बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे; आपण अधर्म करतो हे त्यांना कळत नाही.


ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;


मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;


ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.


मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.


त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.


‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.


तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.


‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”


आणि ‘संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे’ आणि ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती करणे’ हे सर्व ‘होमार्पण व यज्ञ’ ह्यांपेक्षा अधिक आहे.”


तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील, आणि मी तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही; म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.”


शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणा केलास, तुझा देव परमेश्वर ह्याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस, मानली असतीस तर परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan