Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 शमुवेल शौलाकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला, “परमेश्वर आपले कल्याण करो; मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग शमुवेल शौलाकडे आला, आणि शौल त्यास म्हणाला, “परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो! मी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:13
17 Iomraidhean Croise  

त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;


आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.”


तेव्हा दाविदाने याबेश-गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यांना सांगितले की, “तुम्ही आपला स्वामी शौल ह्याला मूठमाती दिली ही तुम्ही त्याच्यावर दया केली, ह्याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो.


स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.


जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.


ज्याची दृष्टी कितीतरी उंच, व ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत असा एक वर्ग आहे.


तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.


त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”


परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.


तो आपल्या आईला म्हणाला, “जी अकराशे चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याकडे आहेत. मीच ते घेतले होते.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो.”


तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसर्‍या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.


त्याने होमाची समाप्ती केली तोच शमुवेल आला; तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला.


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


शौल शमुवेलाला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे.


तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.


शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे;


इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबीगईल हिला सांगितले की, “दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेमकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan