Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 15:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सकाळी अगदी पहाटेस शमुवेल उठून शौलाला भेटायला गेला; तेव्हा त्याला कोणी सांगितले की, “शौल कर्मेलास आला आहे आणि तेथे स्वतःच्या स्मरणार्थ त्याने एक विजयस्तंभ उभारला व चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 शमुवेल शौलाला भेटण्यासाठी पहाटेस उठला. तेव्हा कोणी शमुवेलाला सांगितले की, शौल कर्मेलास आला होता आणि पाहा आपणासाठी स्मारक उभारून परतला व खाली गिलगालास गेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 15:12
12 Iomraidhean Croise  

नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली.


आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्‍यात आहे. त्या मनोर्‍याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.


हेस्री कर्मेली, पारय अर्बी,


मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;


तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील, आणि मी तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही; म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.”


मग शमुवेल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली ती सहाशे भरली.


दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्‍याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला.


मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्‍या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता.


मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan