Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:6
31 Iomraidhean Croise  

गथात हे सांगू नका, अष्कलोनच्या आळ्यांत हे जाहीर करू नका; पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्यांच्या कन्या जयघोष करतील; असे न होवो.


मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.”


जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.”


आसा त्याच्याशी सामना करण्यास गेला तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोर्‍यात लढाईस तोंड लागले.


ह्या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुझ्यावाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस.”


परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.


परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;


मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”


वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.


देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्‍यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.


तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू.”


इस्राएलाच्या सर्व वंशांतून, प्रत्येक वंशामागे एकेक हजार पुरुष युद्धासाठी पाठवा.”


येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”


नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वराचा धावा करत म्हणाला, “तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिलास खरा, पण मी आता तहानेने तडफडून मरावे आणि बेसुनत लोकांच्या हाती पडावे काय?”


एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे.


त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला म्हटले, “आपल्या मनाला येईल ते सगळे करा, तेथे चला; आपल्या मर्जीप्रमाणे मी आपल्याबरोबर आहे.”


आसपास उभे असणार्‍या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्‍या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;


आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे; तो तुम्हांला आमच्या हाती देईल.”


तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan