Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:47
17 Iomraidhean Croise  

थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


एसाव म्हणजे अदोम ह्याची वंशावळ :


एसाव म्हणजे अदोम ह्याचा हा वंश, व हे त्यांचे सरदार.


म्हणून एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम.


वधलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तलवार कधी रिकामी परतत नसे.


दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.


सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला.


देवाने शलमोनावर दुसरा एक शत्रू उठवला, त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन; तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर ह्याच्यापासून पळून गेला होता.


ह्या नभोमंडळाखालून इस्राएलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता, म्हणून त्याने योवाशाचा पुत्र यराबाम ह्याच्या द्वारे त्यांची सोडवणूक केली.


तर आता तो राजा तुमच्यासमोर वर्तत आहे; मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत आणि पाहा, माझे पुत्र तुमच्यामध्ये आहेत; मी बाळपणापासून आजवर तुमच्यासमोर वागलो-वर्तलो आहे.


शौल तीस1 वर्षांचा असता राज्य करू लागला. त्याने दोन वर्षे इस्राएलावर राज्य केल्यावर,


शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत गेला, आणि पलिष्टीही आपापल्या ठिकाणी गेले.


शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.


त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता; तो अदोमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan