१ शमुवेल 14:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 शौल म्हणाला, “लोकांमध्ये चोहोकडे जाऊन त्यांना सांगा की, आपापले बैल व मेंढरे माझ्याकडे घेऊन या आणि येथेच कापून खा; रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी त्या रात्री आपापले बैल तेथे नेऊन कापले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ” तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले. Faic an caibideil |