Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:19
8 Iomraidhean Croise  

तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”


तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.


शमुवेलाने त्याला विचारले, “तू हे काय केलेस?” तेव्हा शौलाने म्हटले, “जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले,


मग शौल व त्याच्याबरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईला गेले; तेव्हा प्रत्येकाची तलवार त्याच्या-त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले.


त्या दिवशी इस्राएल लोक अतिशय दुःखी झाले; कारण शौलाने लोकांना शपथ घातली होती की, “मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यायचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नाला स्पर्श करील त्याला शाप लागो;” म्हणून त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नाला शिवला नाही.


दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan