Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:15
18 Iomraidhean Croise  

मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.


तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.”


त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.


पाहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकांत वस्ती करतो


सर्व सीनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण ‘असे होणे अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यात शेवट होत नाही.


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली; तिने ओरडत ओरडत पळ काढला.


मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली.


दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोर्‍याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली.


नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.


योनाथान व त्याचा शस्त्रवाहक ह्यांनी जी पहिली कत्तल केली तींत एक बिघाभर जमिनीवर सुमारे वीस माणसे पडली.


इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले.


शमुवेल होमार्पण करत असताना पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ येऊन ठेपले; त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले, आणि इस्राएलापुढे त्यांचा मोड झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan