Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या ठाण्यातले लोक योनाथानाला व त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही दाखवू.” योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागून वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.” तेव्हा योनाथान शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, माझ्यामागे वर ये; कारण याहवेहने त्यांना इस्राएलच्या हाती दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:12
13 Iomraidhean Croise  

मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर,


मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर ह्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले.


तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.”


मग अमस्याने इस्राएलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज बिन येहू ह्याला जासुदांच्या हाती निरोप पाठवला की, “चल, आपण सामना करू.”


दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.


त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्राएली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे; त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे.”


ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले; मग तो इस्राएलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, “ऊठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे.”


तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या शस्त्रवाहक तरुणाला बोलावून म्हटले, “आपली तलवार उपसून मला छाटून टाक, नाहीतर एका बाईने ह्याला जिवे मारले असे लोक म्हणतील.” त्या तरुणाने त्याला भोसकले तेव्हा तो मरण पावला.


पण जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण वर जाऊ; परमेश्वराने त्यांना आपल्या हाती दिले आहे ह्याची हीच खूण आपण समजू.”


योनाथान व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिष्टी लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan