Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 14:1
13 Iomraidhean Croise  

सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.


तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.


त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही.


गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले.


इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.


ह्यामुळे युद्धाच्या दिवशी असे झाले की शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्याजवळ मात्र ही हत्यारे होती.


नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.


शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते;


ती आपल्या चाकरांना म्हणाली, “तुम्ही पुढे चला, मी तुमच्यामागून येते.” ह्याविषयी तिने आपला नवरा नाबाल ह्याला काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan