Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा “होमबली व शांत्यर्पणे माझ्याकडे आणा” असे सांगून शौलाने स्वतःच होम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:9
13 Iomraidhean Croise  

दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.


राजा गिबोन येथे यज्ञ करायला गेला; ते सर्वांत मोठे उच्च स्थान होते; तेथल्या वेदीवर शलमोनाने एक सहस्र होमबली अर्पण केले.


परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


“वाइटाचा बदला मी घेईन” असे म्हणू नकोस; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा;


आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;


मग शौल अहीयाला म्हणाला, “देवाचा कोश इकडे आण.” देवाचा कोश त्या समयी इस्राएल लोकांबरोबरच होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan