Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 गिब्यात पलिष्ट्यांच्या सैन्यांना योनाथानाने पराजित केले आणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले, “इब्र्यांना ऐकू द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:3
12 Iomraidhean Croise  

मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्राएलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही.


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.


ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे.


तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल.


कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी;


बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,


तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.


परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले.


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan