Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने इस्राएलातून तीन हजार पुरुष निवडून घेतले; त्यातले दोन हजार त्याच्याबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते आणि योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात एक हजार होते. बाकीच्या लोकांस त्याने त्यांच्या घराकडे पाठवले, प्रत्येकजण त्याच्या तंबूकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:2
24 Iomraidhean Croise  

बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.”


बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,


मिखमासाचे लोक एकशे बावीस,


गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,


सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.


मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले.


पण त्याचा धनी त्याला म्हणाला, “इस्राएल लोक नसलेल्या परक्यांच्या ह्या नगरात आपण उतरू नये; आपण पुढे गिबा येथे जाऊ.”


शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले.


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


शौल तीस1 वर्षांचा असता राज्य करू लागला. त्याने दोन वर्षे इस्राएलावर राज्य केल्यावर,


शमुवेलाने त्याला विचारले, “तू हे काय केलेस?” तेव्हा शौलाने म्हटले, “जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले,


मग शमुवेल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली ती सहाशे भरली.


शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले.


नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.


तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.


त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते;


एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे.


शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.


मग शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला.


वाटेने जाताना तो एका मेंढवाड्याजवळ आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूला दावीद व त्याचे लोक बसले होते.


तेव्हा शौल इस्राएलातले तीन हजार निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध करायला जीफ रानात निघून गेला.


तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan