Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 शमुवेलाने त्याला विचारले, “तू हे काय केलेस?” तेव्हा शौलाने म्हटले, “जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा शमुवेल म्हणाला, “तू हे काय केले आहे?” शौलाने म्हटले, “कारण मी पाहिले की, लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आत तुम्ही आला नाही, आणि पलिष्टी मिखमाश येथे जमले आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा शमुवेलने विचारले, “तू हे काय केले आहेस?” शौलाने उत्तर दिले, “जेव्हा मी पाहिले की, लोक निघून जात आहेत आणि ठरविलेल्या वेळात तुम्ही आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिकमाश येथे जमत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 13:11
12 Iomraidhean Croise  

परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.”


तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.


यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला.


त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलीशा त्याला म्हणाला, “गेहजी, तू कोठून आलास?” त्याने म्हटले, “आपला दास कोठेही गेला नव्हता.”


तो अयाथास आला, मिग्रोनातून पार गेला; मिखमाशात त्याने आपला सरंजाम ठेवला आहे;


तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान; त्याच्यापुढे कबूल कर; तू काय केलेस ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नकोस.”


तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील, आणि मी तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही; म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.”


शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले.


इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.


नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.


तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्‍यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.


एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan