Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहे आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.” ते म्हणाले, “होय, याहवेह साक्षी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 12:5
14 Iomraidhean Croise  

तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”


ह्या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी उर्ध्वलोकी आहे.


परमेश्वराचे ईयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलीफज तेमानीला म्हणाला, “तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण माझ्याविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही.


तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे.


चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दोन-दोन द्यावी.


पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही.


तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? [आपण देवाशी भांडू नये].”


ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.


किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे.


कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला फसवले नाही; आमच्यावर जुलूम केला नाही; अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही.”


दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan