Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तर आता तो राजा तुमच्यासमोर वर्तत आहे; मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत आणि पाहा, माझे पुत्र तुमच्यामध्ये आहेत; मी बाळपणापासून आजवर तुमच्यासमोर वागलो-वर्तलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आता तुमचा पुढारी म्हणून तुमच्याकडे राजा आहे. मी तर उतार वयाचा होऊन माझे केस पांढरे झाले आहेत, आणि माझी मुले येथे तुमच्याबरोबर आहेत. माझ्या तरुणपणाच्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमचा पुढारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 12:2
17 Iomraidhean Croise  

मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”


कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.


इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला; आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला;


तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएलांना म्हणजे त्यांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावून म्हटले, “मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे;


कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;


एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


एलीने शमुवेलास हाक मारून म्हटले, “मुला, शमुवेला,” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”


शमुवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्राएलाचे न्यायाधीश म्हणून नेमले.


म्हणजे इतर सर्व राष्ट्रांसमान आम्ही होऊ; आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करील व आमच्यापुढे चालून तो आमच्या लढाया लढेल.”


पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत.


ते त्याला म्हणाले, “पाहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत; तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan