Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली, आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली; तेव्हा सर्व लोकांना परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा शमुवेलाने परमेश्वरास हाक मारली आणि त्याच दिवशी परमेश्वराने मेघगर्जनासह पाऊस पाठवला. म्हणून सर्व लोकांस परमेश्वराचे व शमुवेलाचे फार भय वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 12:18
10 Iomraidhean Croise  

मग अहाब खाण्यापिण्यासाठी वरती गेला. इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.


मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.


शिक्षेसाठी असो, त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो, किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यांना पाठवतो.


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


परमेश्वराने मिसर्‍यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्याच्यावर विश्वास ठेवला.


परमेश्वराने अमोर्‍यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्‍यावर स्थिर हो.”


त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan