Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी (पहाटे) त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांची कत्तल केली; आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 11:11
14 Iomraidhean Croise  

म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.


मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”


देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.


आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली.


कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातापायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचत असत; माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले; तेथे तो मृत्यू पावला. यहूदा यरुशलेम व हेब्रोन हस्तगत करतो


इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.


त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या.


तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हातात दिवट्या आणि उजव्या हातात फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार असा घोष केला.


आपल्या लोकांच्या तीन तुकड्या करून तो शेतात दबा धरून बसला; आणि लोक नगरातून बाहेर निघत आहेत असे पाहून त्याने त्यांच्यावर चाल करून त्यांचा संहार केला.


नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलाची अप्रतिष्ठा करीन, ह्या अटीवर मी तुमच्याशी करार करीन.”


इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.


Lean sinn:

Sanasan


Sanasan