Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल, तेथे तीन माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील, त्यांतल्या एकाच्या हातात तीन करडे, दुसर्‍याच्या हातात तीन भाकरी आणि तिसर्‍याच्या हातात एक द्राक्षारसाचा बुधला असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 10:3
22 Iomraidhean Croise  

त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते.


हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”


मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा; आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध.”


आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा.


कोणाला बकर्‍याचे अर्पण करायचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे.


परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडामेंढरांचे अर्पण आणायचे असेल, ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे.


त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्यात.


सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ-ताबोर ह्याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते;


त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेजवळ संपते; त्यांना ही सोळा नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.


मग इस्राएल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, “बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “प्रथम यहूदाने जावे.”


इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”


ह्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्‍न केला. (कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथेच होता.


इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,


तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?


मग त्याने जेबह व सलमुन्ना ह्यांना विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच होते. ते सगळे राजकुमारांसारखे होते.”


ते तुला सलाम करतील. तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan