Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 10:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परंतु काही कुचकामी माणसे होती ती म्हणाली, “हा पुरुष आम्हास कसा काय सोडवील?” त्यांनी त्याचा अनादर केला व त्यास काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परंतु काही अधर्मी लोक म्हणाले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याच्यासाठी भेटी आणल्या नाहीत. परंतु शौल शांत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 10:27
21 Iomraidhean Croise  

बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्‍या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.


येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.


महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.


काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.


त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.


ह्यास्तव परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबुती केली; सर्व यहूदी लोक त्याला भेटी आणत, तो धन व मान ह्यांमुळे संपन्न झाला.


मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नकोस, देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील;


ह्यावर ते गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण ‘तुम्ही त्याला उत्तर देऊ नये’ अशी राजाची त्यांना ताकीद होती.


नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली.


‘तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले,’ असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.


तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,


मग लोकांनी शमुवेलास विचारले, “हा शौल आमच्यावर राज्य करणार काय, असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांना बाहेर काढा म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू.”


शौल म्हणाला, “आज कोणाही मनुष्याचा वध करायचा नाही; कारण आज परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.”


मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले.


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan