Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण तुम्हांला सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणार्‍या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे, व तुम्ही त्याला म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आमच्यावर राजा नेमावा; तर आता वंशावंशांनी आणि हजाराहजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हास सोडवतो त्यास तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्यास म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु तुम्ही आता तुमच्या परमेश्वराला नाकारले आहे, जे तुम्हाला तुमच्या सर्व अरिष्टांपासून आणि संकटांपासून वाचवितात. आणि तुम्ही म्हणाला, ‘नको, आता आमच्यावर एक राजा नेम.’ तर आता तुमच्या गोत्रानुसार व कुळांनुसार याहवेहसमोर हजर व्हा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 10:19
18 Iomraidhean Croise  

पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”


“इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे-त्याचे नाव लिही;


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा;


नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले.


गिदोन त्यांना म्हणाला, “मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही; माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवील.”


शमुवेलाने सगळे वंश जवळ आणले, आणि बन्यामिनाच्या वंशाची चिठ्ठी निघाली.


तरीपण अम्मोन्यांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहे असे तुम्ही पाहिले तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणालात, ‘हे ठीक नाही, आमच्यावर राज्य करण्यास राजा असावा.’


ह्या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्राएल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेथ-आवेनापर्यंत गेले.


शौल म्हणाला, “लोकनायकहो, इकडे या; आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे ह्याचा शोध करून पाहा.


परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमुवेलाला प्रकट झाला.


शमुवेलाची ही हकिकत सर्व इस्राएलात पसरली. ह्यानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले; त्यांनी एबन-एजर येथे तळ दिला, आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.


तरीपण लोक शमुवेलाचे म्हणणे ऐकेनात; ते म्हणाले, “नाही, नाही! आमच्यावर राजा पाहिजेच;


ते त्याला म्हणाले, “पाहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत; तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan