Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटेल तसे कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा; परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले.” तेव्हा ती स्त्री घरी राहिली, आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “तुला जे उत्तम वाटते ते तू कर,” तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. “त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 1:23
12 Iomraidhean Croise  

तर आता, हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिलेस ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर.


सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले.”


परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस; मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस.


मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’


पण नवर्‍याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली, तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील; तिच्या नवर्‍याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.


त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!


मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!”


तेव्हा एली तिला म्हणाला, “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देवो.”


शौल म्हणाला, “आपण आज रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यांना लुटू; त्यांतला एक मनुष्यही सोडता कामा नये.” ते म्हणाले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.” त्या वेळी याजकाने म्हटले, “चला, आपण येथे देवासमीप जाऊ.”


मग त्याने इस्राएल लोकांना सांगितले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसर्‍या बाजूला होऊ.” लोकांनी शौलाला म्हटले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan