Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग एलकाना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण करायला व नवस फेडायला आपल्या सगळ्या परिवारासह गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा तिचा पती एलकानाह त्याच्या सर्व कुटुंबाबरोबर याहवेहसाठी वार्षिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 1:21
7 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;


परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”


हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत.


त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दर वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करायला येई त्या वेळी त्याला तो देत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan