Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ शमुवेल 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ शमुवेल 1:19
23 Iomraidhean Croise  

ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.


मग देवाने राहेलीची आठवण केली; आणि त्याने तिचे गार्‍हाणे ऐकून तिची कूस वाहती केली.


आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणले; ती गर्भवती होऊन तिने काइनाला जन्म दिला; ती म्हणाली, “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”


मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;


पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला.


उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो.


ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस; तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.


हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.


संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्‍हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल.


मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.


मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”


गिबोन, रामा व बैरोथ;


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता; त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलीहू बिन तोहू बिन सूफ एफ्राइमी असे होते.


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


मग शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला.


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


दावीद पळून निभावून रामास शमुवेलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याच्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले.


नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य


पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला.


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


नंतर इस्राएलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमुवेलाकडे आले.


सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शौल धाब्यावर होता त्याला शमुवेलाने हाक मारून म्हटले, “ऊठ, मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि तो व शमुवेल असे दोघे बाहेर पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan