१ शमुवेल 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ती नवस करून म्हणाली, “हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्यास त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वरास देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.” Faic an caibideil |