Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तसेच तरुणांनो, वडीलजनांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 5:5
27 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, देवा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये; हे परमेश्वरा, देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत.


त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला,1 तर तू ‘वर! वर!’ असेच म्हणशील; कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील.


नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे.


मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन; तिच्यातील भक्त मोठा आनंदघोष करतील.


तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; तुझे भक्त आनंदघोष करोत;


परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.


कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे.


उपहास करणार्‍यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करतो.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील; ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील, क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझ्याविषयी ते विस्मय पावतील.


लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.


पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.


परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्‍यासारखा असावा.


बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;


वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.


आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तिरूपी शस्त्र धारण करा; कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे;


जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan