Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नीतिमान माणसाचे तारण होणे जर अवघड असते, तर भक्तिहीन व पापी लोकांची अवस्था काय होईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि, “जर नीतिमान लोकांचे तारण कष्टाने होते, तर अनीतिमान व पापी लोकांचे काय होईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:18
27 Iomraidhean Croise  

सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.


पाहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल!


कारण पाहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणतो, तर तुम्ही अगदी शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हांला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मारण्यासाठी मी तलवार बोलावत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.’


तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल.


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.


ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?”


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’


तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.”


वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.


आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला.


परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.


म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.


आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,


म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू.


नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला; तो तुम्हांला विरोध करत नाही.


सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.


पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.


मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan