Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्याप्रणाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 4:10
29 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”


सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.


कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल.


ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण?


तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले.


त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’


कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.”


तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?


त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’


आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.


सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो.


त्यांना बरे वाटले होते खरे आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत.


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.


तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;


मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी;


आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;


(प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.


अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा;


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan