Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणार्‍या पवित्र स्त्रियांही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवत असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण देवावर आशा ठेवणार्‍या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही पतीच्या अधीन राहून आपले अंतरिक सौंदर्य जोपासत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:5
17 Iomraidhean Croise  

सद्‍गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे.


सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते.


तुझे अनाथ राहू दे; मी त्यांना जिवंत ठेवीन; तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवोत.”


आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.


हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत.


यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.


तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.


तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे.


तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यांत त्या राहिल्यास बालकाला1 जन्म देण्याच्या योगे2 त्यांचे तारण होईल.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;


वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्‍यास विश्वसनीय मानले.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.


हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan