Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे अशी बाहेरून दिसणारी नसावी,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तुमचे सौंदर्य केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोषाख करणे असे बाहेरून दिसणारे नसावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:3
22 Iomraidhean Croise  

उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या,


मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी; तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातांत बांगड्या घातल्या.


मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या.


येहू इज्रेलास आल्याचे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली.


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत; ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे.


तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिर्‍हाड करून राहणार्‍या स्त्रीपासून सोन्या-रुप्याचे अलंकार व पोशाख मागून घेईल; ते तुम्ही आपल्या मुलामुलींना घालाल; ह्या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांना लुटाल.”


तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, “तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या.”


लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले; व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत.


ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले आणि त्यांनी नथी, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले.


त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शनमंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत.


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


तसेच तुम्ही दूरदूरच्या पुरुषांना बोलावणे पाठवले; त्यांच्याकडे जासूद पाठवला आणि पाहा, ते आले; त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यांत काजळ घातले व दागिन्यांनी आपणास सजवले;


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan