Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:11
37 Iomraidhean Croise  

ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.


परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही; त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरून राहिला आहे.”


तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’


हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.


वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.


वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील.


दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.


अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.


जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही.


‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”


तुम्ही तर आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”


तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.


शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.


कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे.


तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्‍या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.


ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.


कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो.


तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो.


कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.


ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.


चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे;


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.


चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.


कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’


प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्‍याने देवाला पाहिलेले नाही.


इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा :


Lean sinn:

Sanasan


Sanasan