Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1-2 तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1-2 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1-2 स्त्रियांनो, तुम्हीही पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की, त्यांच्यापैकी कोणी देवाचे वचन स्वीकारीत नसतील, तर तुमचे आदरयुक्त शुद्ध वर्तन पाहून ते आपल्या पत्नीच्या वर्तनाने श्रद्धावान होतील; तुम्हांला एक शब्दही उच्चारावा लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:1
26 Iomraidhean Croise  

तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो.


दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.


तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल.


तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”


तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले,


पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते.


प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.


तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे.


कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?


तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.


स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.


बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,


निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


Lean sinn:

Sanasan


Sanasan