Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:18
28 Iomraidhean Croise  

खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


कारण परमेश्वर म्हणतो की : “मोलावाचून तुम्हांला विकले आणि पैक्यावाचून तुमची मुक्तता होणार.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


त्या काळी ह्या लोकांना व यरुशलेमेस म्हणतील, “रानातील उजाड टेकड्यांवरून उष्ण वारा माझ्या लोकांच्या कन्येवर येत आहे, तो काही विंझणवारा म्हणून किंवा स्वच्छ करण्यासाठी येत नाही.


आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.


तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले.


तसेच रानात मी त्यांच्या वंशजांना म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका, व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळू नका.


परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?


देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.


आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे.


कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.


तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan