Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 इस्राएल लोकांचे सर्व वडील जन आले तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 इस्राएलची सर्व वडिलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 8:3
13 Iomraidhean Croise  

परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.


मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्‍यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला.


दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्‍या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.”


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती.


मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले.


त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हालवून त्याच्या पाठोपाठ जा;


नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले.


तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा धोंडे उभे केले; ते आजपर्यंत तेथे आहेत.


नंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने याजकांना बोलावून म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजक सात रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan