Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने लबानोनगृह नावाची इमारत बांधली होती; तिची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती; ती इमारत गंधसरू लाकडाच्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; त्या खांबांवर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 7:2
8 Iomraidhean Croise  

तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या.


शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.


खांबांच्या वर एकेका मजल्यावर पंधरा-पंधरा अशा पंचेचाळीस कोठड्या त्याने केल्या होत्या; त्यांना गंधसरूचा कडीपाट होता.


शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा बांधायचे संपवले व ह्याप्रमाणे त्याच्या मनाला जे करावेसे वाटले ते त्याने केले.


ह्याखेरीज आणखी भांडारासाठी आणि रथ व स्वार ह्यांच्यासाठी नगरे बांधली आणि तसेच यरुशलेमेत, लबानोनावर व आपल्या सर्व राज्यात आपल्या मनास आले तेही सर्व त्याने बांधले.


त्याप्रमाणेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीनशे शेकेल सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोनगृहात ठेवल्या.


तुझा कंठ हस्तदंती मनोर्‍यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे.


तेव्हा त्याने यहूदाची झापड दूर केली; त्या दिवशी तू वनगृहातील शस्त्रागाराकडे दृष्टी लावली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan