Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 “तुम्हास माहित आहे माझे वडिल दावीद सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंना पायदळी तुडवीपर्यंत ते थांबले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 5:3
17 Iomraidhean Croise  

पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.


पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की, ‘तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्धे केली आहेत; तुला माझ्या नामाने मंदिर बांधायचे नाही, कारण तू माझ्यादेखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहेस.


मग दावीद राजा उभा राहून म्हणाला, “माझे बांधव व माझे प्रजाजनहो, माझे म्हणणे ऐका; परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्रामभवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती;


परंतु देवाने मला म्हटले, ‘माझ्या नामाप्रीत्यर्थ तुला मंदिर बांधायचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहेस;’


त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख; त्याचे प्यालेबरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जाण्याचा त्याचा तो जिना, हे सगळे पाहून ती गांगरून गेली.


दीडशे यहूदी व शास्ते आणि आमच्याभोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक आमच्याकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत.


दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे शिजवत तसेच माझ्यासाठी पाखरे तयार करत आणि दर दहा दिवसांनी सर्व जातींचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेवन केले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता.


माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”


तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस.


तुम्ही दुष्टांना तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.


त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले;


सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा;


ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, “पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan