Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 राजा गिबोन येथे यज्ञ करायला गेला; ते सर्वांत मोठे उच्च स्थान होते; तेथल्या वेदीवर शलमोनाने एक सहस्र होमबली अर्पण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 3:4
18 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा कोश, दर्शनमंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक व लेवी ह्यांनी वरती वाहून नेली.


शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले.


तेव्हा परमेश्वराने त्याला गिबोन येथे दर्शन दिले होते त्याप्रमाणे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले.


आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद ह्यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर योजना केली;


मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती.


शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून


शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता.


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्‍हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्‍हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.


शलमोन राजाने बावीस हजार बैल व एक लक्ष वीस हजार मेंढरे ह्यांचा यज्ञ केला. अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाचे मंदिर समर्पित केले.


लबानोन जळणास पुरायचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडायचे नाहीत;


नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की,


तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते; ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.


बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली : यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,


यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,


तेव्हा “होमबली व शांत्यर्पणे माझ्याकडे आणा” असे सांगून शौलाने स्वतःच होम केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan