Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 10:2
15 Iomraidhean Croise  

मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.


तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


शलमोनाने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती.


तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते.


अरामाच्या राजाने म्हटले, “जा तर मग. मी इस्राएलाच्या राजाला पत्र देतो.” मग तो माणूस दहा किक्कार1 चांदी, सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला.


तेव्हा नामान घोड्यांरथांनिशी अलीशाच्या दारी जाऊन उभा राहिला.


“तुझ्याशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्यावाचून कोणाच्याने राहवेल?


त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;


दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.


शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करीत; ते तुझा माल घेऊन तुला हरतर्‍हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत.


आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला;


दुसर्‍या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan