Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 10:1
28 Iomraidhean Croise  

दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.


दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.


तो चिरायू होवो व त्याला शबाचे सोने मिळो; त्याच्यासाठी सतत प्रार्थना केली जावो; त्याचा धन्यवाद दिवसभर होवो.


ओबाल, अबीमाएल, शबा,


कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


मी दृष्टान्ताकडे कान लावीन; मी वीणेवर गाणी गाऊन गूढवचन उलगडून सांगेन.


तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’


तेमाच्या प्रवाशांनी त्यांचा शोध केला; शबाच्या काफल्यांनी त्यांची अपेक्षा केली;


पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.


तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.


यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते.


सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.


ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”


त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.


शबा, ददान आणि तार्शीश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, ‘तू लुटालूट करण्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमवला आहेस काय? सोनेरुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय?’


तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्‍यांवर होता.


देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे लोक त्याच्या दर्शनाला येत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan