Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 1:5
19 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.


हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला;


मग शलमोनाची आई बथशेबा हिला नाथान म्हणाला, “आपला स्वामी दावीद ह्याला नकळत हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा होऊन बसला आहे हे तू ऐकले नाहीस काय?


ती तरुणी फार सुंदर होती; ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली; पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. अदोनीया गादी हिरावून घेतो


मग हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे आला; तेव्हा ती त्याला म्हणाली, “तू मित्रभावाने आला आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मी मित्रभावाने आलो आहे.


तो म्हणाला, “तुला ठाऊक आहेच की मला राज्य मिळाले होते आणि मी राज्य करावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे माझ्याकडे लागले होते, पण आता राज्यक्रांती होऊन ते माझ्या बंधूस मिळाले आहे. कारण परमेश्वराकडून ते त्याला मिळाले आहे.


ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद ह्याच्या गादीवर मला बसवले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापन केले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनीयास देहान्त शासन होईल.”


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


नंतर दावीद राजाने सर्व मंडळीला म्हटले, “माझा पुत्र शलमोन सुकुमार बालक आहे, ह्यालाच देवाने निवडले आहे आणि काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.


गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा;


तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय?


गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


त्यांचा देश सोन्यारुप्याने भरला आहे; त्यांच्या निधींना अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही.


कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्‍यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”


“शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांना विचारा की, यरुब्बालाच्या सत्तर मुलांनी तुमच्यावर अधिकार गाजवावा की एकानेच गाजवावा ह्यांपैकी तुम्हांला कोणते इष्ट आहे? पण लक्षात ठेवा की, मी तुमच्या हाडामांसाचा आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan